IPL 2022 : हार्दिक पांड्या अहमदाबादचा तर, लोकेश राहुल लखनौ टीम चा कर्णधार..
इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 15 व्या हंगामात नव्याने दाखल झालेल्या दोन संघापैकी अहमदाबाद संघाने 2022 साठी हार्दिकला कर्णधार पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
हार्दिकला मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले नाही. आयपीएल-2022 मेगा लिलावापूर्वी हार्दिक, राशिद खान आणि शुबमन गिल अहमदाबाद फ्रँचायजीचा भाग असणार आहेत. अहमदाबाद हा आयपीएलचा नवा संघ आहे.
या संघाला मेगा लिलावापूर्वी महालिलावातील तीन खेळाडूंना निवडण्याचा अधिकार आहे. या अंतर्गत त्यांनी हार्दिक, राशिद आणि शुभमन यांची निवड केली आहे.
राहुल लखनऊचा कॅप्टन.
लखनौ फ्रँचायझीनेही करारबद्ध केलेल्या खेळाडूंची नावे समोर आली आहेत. लोकेश राहुल हा लखनऊ फ्रँचायझीच्या पहिल्या पसंतीचा खेळाडू होताच आणि त्यांनी त्याला करारबद्ध केले आहे.
त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस आणि अनकॅप भारतीय फिरकीपटू रवी बिश्नोई हे लखनौ फ्रँचायझीनं करारबद्ध केलेल उर्वरित दोन खेळाडू आहेत. लखनौ फ्रँचायझीने राहुलला 15 कोटी, स्टॉयनिसला 11 कोटी आणि बिश्नोईला 4 कोटींत ताफ्यात घेताना आयपीएल मेगा ऑक्शनसाठी 60 कोटी वाचवले आहेत.
कोणत्या फ्रेंचायझीनं कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन ?
मुंबई इंडियन्स –
• रोहित शर्मा ( 16 कोटी ),
• जसप्रीत बुमराह ( 12 कोटी ),
• सुर्यकुमार यादव ( 8 कोटी ),
• कायरन पोलार्ड ( 6 कोटी ),
चेन्नई सुपर किंग्ज-
• महेंद्र सिंह धोनी ( 12 कोटी ) ,
• रविंद्र जाडेजा (16 कोटी),
• मोईन अली ( 8 कोटी )
• ऋतुराज गायकवाड (6 कोटी)
रॉयल चॅलेजर्स बंगळरू –
• विराट कोहली ( 15 कोटी ),
• ग्लेन मॅक्सवेल ( 11 कोटी )
• मोहम्मद सिराज ( 7 कोटी )
दिल्ली कॅपिटल्स–
• रिषभ पंत ( 16 कोटी ),
• अक्षर पटेल ( 9 कोटी ),
• पृथ्वी शॉ ( 7.50 कोटी )
• ॲनरिच नॉर्टीजे ( 6.50 कोटी ) .
सनराईजर्स हैदराबाद-
• केन विल्यमसन ( 14 कोटी ),
• अब्दुल समद ( 4 कोटी ),
• उमरान मलिक ( 4 कोटी )
कोलकाता नाईट रायडर्स-
• आंद्रे रसल ( 12 कोटी ),
• वरुण चक्रवर्ती ( 8 कोटी ),
• व्यंकटेश अय्यर ( 8 कोटी )
• सुनील नारायण ( 6 कोटी )
पंजाब किंग्ज-
• मयांक अग्रवाल ( 12 कोटी ),
• अशदीप सिंह ( 4 कोटी )
राजस्थान रॉयल्स-
• संजू सॅमसन ( 14 कोटी ),
• जॉस बटलर ( 10 कोटी ),
• यशस्वी जयस्वाल ( 4 कोटी ) .
लखनौ –
• केएल . राहुल ( 17 कोटी ),
• मार्कस स्टॉयनिस ( 9.2 कोटी ),
• रवि बिश्नोई ( 4 कोटी )
अहमदाबाद –
• हार्दिक पांड्या ( 15 कोटी ),
• राशिद खान ( 15 कोटी ),
• शुबमन गिल ( 8 कोटी )