BSF मध्ये नोकरीची संधी, तुमच्याकडे ही पात्रता असल्यास अर्ज करा
सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक, BSF ने ९० गट B पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in ला भेट द्यावी लागेल. उमेदवारांना नोकरीची जाहिरात जारी झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल.
याबाबतची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. आर्किटेक्ट आणि कनिष्ठ अभियंता या पदांसाठी अर्ज करू शकतात.
इन्स्पेक्टर आर्किटेक्ट : १
आर्किटेक्चर पदवी असलेले आणि अधिनियम 1972 अंतर्गत कौन्सिल फॉर आर्किटेक्चर अंतर्गत नोंदणीकृत उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
उपनिरीक्षक : ५७
उमेदवाराने सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा कोर्स केलेला असावा. उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक इलेक्ट्रिकल: ३२
कोणत्याही सरकारी संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा. उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क : OBC आणि जनरल प्रवर्गासाठी – १००
तर SC, ST, आणि ExSM या प्रवर्गांसाठी – ०
अधिकृत वेबसाईट : https://bsf.gov.in/
ऑनलाइन अर्ज : https://rectt.bsf.gov.in/#bsf-current-openings
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ६ जून २०२२