Ladki Bahin Yojana : महिलांना दर महिन्याला मिळणार 1500 रुपये, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेसाठी असा करा अर्ज..

Ladki Bahin Yojana : दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही सरकारची महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना सुरू करत असल्याची घोषणा केली.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

महिलांचं त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य, सर्वांगीण विकास आणि स्वावलंब बनाण्यासाठी Ladki Bahin Yojana अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना राज्य शासनातर्फे दरमहा 1 हजार 500 रुपये देण्यात येणार असून या योजनेकरता दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे, तसेच या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येणार आहे.

“मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Ladli Behna Yojana in Maharashtra)योजनेचे लाभार्थी :

महाराष्ट्रातील 21 ते 60 वय असलेल्या महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्त्या आणि निराधार महिला.

Ladki Bahin Yojana योजनेचे निकष व पात्रता :

  • वार्षिक उत्पन्न 2,50,500 पेक्षा कमी असणे आवश्यक
  • लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • न्यूनतम 21 ते अधिकतम 60 वर्षे वयाच्यांच महिलांना अर्ज करता येणार.
  • या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार महिला लाभार्थीचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

कोण अपात्र असेल?

Mazi Ladki Bahin Yojana साठी लागणारी कागदपत्रे

  • ऑनलाईन अर्ज
  • लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, किंवा महाराष्ट्रातील जन्म दाखला.
  • सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
  • बँक खाते पासबुकची झेरॉक्स प्रत.
  • 2 पासपोर्ट आकाराचे फोटो
  • रेशन कार्ड
  • योजनेच्या लाभासाठी अटी आणि शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा?

  • योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.
  • ज्या महिलेला ऑनलाईन प्रकारे अर्ज करता येत नाही, त्यांना अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), याठिकाणी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने दाखल केल्यानंतर पोच पावती दिली जाईल.
  • अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया मोफत असेल.
  • अर्जदार महिलेने स्वतः अर्ज भरण्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे, जेणेकरून अर्जदार महिकेचा फोटो काढून ई केवायसी करता येईल.
  • महिलेने अर्जकरता वेळेस कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत बाळगणे आवश्यक आहे.

या योजनेचा GR डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा..

Ladki Bahin Yojana

Similar Posts