Land record : तलाठ्याकडे न जाता ऑनलाइन काढा 7/12, 8 अ, जुने फेरफार अन् प्रॉपर्टी कार्ड; मोबाईलवर घरबसल्या सर्व कागदपत्रे डाऊनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत…!
Land record : शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही सरकारची योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा शेतीसाठी कर्ज घ्यायचं असल्यास तलाठ्याकडे जाऊन सातबारा उतारा (Satbara Utara), जुन्यात जुने फेरफार नक्कल अशी किंवा 8-अ उतारा हे उतारे काढावेच लागतात.
या कामासाठी तलाठ्याकडे हेलपाटे घालायचे म्हटलं तर वेळे बरोबर पैसेही जातात.. मात्र आता चिंता करायची गरज नाही, आम्ही तुम्हाला एक अश्या एका सुविधेबाबत सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला अगदी घरबसल्या 1 रुपयाही खर्च न करता तुमच्या मोबाईलमध्ये 7/12, 8 अ, जुने फेरफार अन् प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड करू शकता. होय, शेतकऱ्यांचं काम सोप्प व्हावं या करिता आम्ही तुमच्यासाठी Hello Krushi चे मोबाईल एप्लीकेशन बद्दलची माहिती सांगणार आहोत. हॅलो कृषी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुमची सर्व कामे चुटकीसरशी पूर्ण होतील.
Hello Krushi App वापरण्याचे फायदे (Land record)
1) तलाठ्याकडे जाऊन तलठ्याची वाट पहावी लागत नाही.
2) तलाठीचे कार्यालय उघडण्याची वाट पाहावी लागत नाही; अगदी चुटकी सरशी आणि त्वरित कागदपत्रे मिळतात.
3) तलाठी कार्यालयमध्ये सारखे सारखे हेलपाटे मारावे लागत नाहीत.
4) तुमच्या मौल्यवान वेळेची बचत होते
पीक विमा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा
5) फेरफार नक्कल, ७/१२, उतारे ८अ उतारा, आणि प्रॉपर्टी कार्ड (Property Card) याप्रकारची सर्व आणि ओरिजिनल कागदपत्रे त्वरित काढता येतात.
6) हे सर्व कागदपत्रे सर्व कायदेशीर बाबीसाठी म्हणजेच लीगल कामासाठी वापरता येतात जसे की, खरेदी-विक्री.
7) आपण आपल्या बरोबरच दुसऱ्यांना सुद्धा या प्रकारची कागदपत्रे काढून देऊ शकता आणि पैसे कमावू शकतात
8) भविष्यामध्ये कोणत्याही कागदपत्रांची गरज आपल्याला नेहमीच लागत असते, त्यामुळे याबद्दलची माहिती लक्षात ठेवावी
9) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व कागदपत्रे तुम्ही तुमच्या मोबाईल/लॅपटॉप/ कंप्युटरच्या मदतीने घरबसल्या काढू शकतो.
तसेच हॅलो कृषी अँपच्या (Hello Krushi App) मदतीने तुम्हाला सर्व पिकांचे बाजारभाव, जमीनीची मोजणी (Land Measurement) , पुढील 4 दिवसांच्या हवामानाचे अंदाज (Havaman Andaj) , जनावरांची खरेदी- विक्री, तुमच्या जवळच्या रोपवाटिका, कृषी केंद्रांचा संपर्क क्रमांक, सर्व सरकारी योजनांना डायरेक्ट अर्ज करण्याची सुविधा, भाडेतत्वावर भेटत असलेल्या शेती संबंधित अवजारांची सेवा, शेतीविषयक तज्ञांचे मार्गदर्शन या प्रकारच्या अनेक सुविधा अगदी मोफत मिळवता येते. त्यासाठी आत्ताचा अँड्रॉइड मोबाईल धारकांनी गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi डाउनलोड करून सर्व सुविधांचा लाभ घ्या.