Land Records Department : आता शेतकऱ्यांमधील वादावादी मिटणार! या नवीन प्रणालीने होणार शेतीची अचूक मोजणी

Land Records Department : राज्य सरकारतर्फे ‘ई-मोजणी २.०’ म्हणजेच E Mojani Version 2 संगणक प्रणाली सुरू झाली आहे. या प्रणालीद्वारे जीआयएस आधारित रोव्हर्सद्वारे शेतजमिनीची मोजणी केली जात आहेत. त्यामुळे नकाशामध्ये प्रत्येक जमिनीच्या हद्दीचे तंतोतंत अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहेत.

Land Records Department
Land Records Department

परिणामी, जमिनीची अचूक मोजणी होऊन शेतकरी आणि जमीनधारकांमधील वाद कमी होण्यास मदत होणार आहे.

Maharashtra Land Records Department state government has started E-Mojani 2.0 computer system

सध्या महाराष्ट्रातील सुमारे १०६ तालुक्यांत ‘ई-मोजणी २.०’ म्हणजेच E Mojani Version 2 प्रणालीच्या माध्यमातून शेतजमीनीची मोजणी सुरू झालेली आहे. या २०२४ वर्ष अखेरपर्यंत ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याचा मानस भूमिअभिलेख विभागाचा आहे. पूर्वी ज्या वेळी राज्य शासनाच्या भूमिअभिलेख विभागाकडून जमिनीची मोजणी करण्यात येत होती तेंव्हा मोजणीच्या वेळी शेजारच्या जमीनधारकांना हजर राहाण्यास सांगितले जात असे.

शेजारच्या जमीनधारकांसमोर जमिनीची मोजणी करून तिथे सीमेचे दगड आणि निशाण्या लावल्या जात. शिवाय मोजणी, सर्व्हे त्यांच्यासमोर करून ती मोजणी सर्वांना मान्य असल्याबाबत जमीनमालकांच्या सह्या घेतल्या जात होत्या. काळाच्या ओघात आता सर्वच अपडेट होताना दिसत आहे.

ई मोजणीसाठी अर्ज कुठे करायचा?
E Mojani Version 2

महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत भूमी अभिलेख विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांना E Mojani Version 2 साठी अर्ज करण्याकरिता एक स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले असून या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ई मोजणीसाठी अर्ज करू शकणार आहेत.त्याची लिंक आम्ही खाली देत आहोत.

Similar Posts