Loan without Cibil Score | असे एकमेव कर्ज जे सिबिल विना मिळतं, 50 लाखापर्यंत मिळेल कर्ज..
Loan without CIBIL Score
Loan without CIBIL Score | आपल्यापैकी बऱ्याच जणांना अत्यंत महत्त्वाच्या कामाकरिता पैशांची नितांत गरज असते, जसे की मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीचे लग्न किंवा घरातील सदस्यांच्या उपचारांचा खर्च जेव्हा आवाक्याबाहेर जातो त्यावेळी आपण मित्रांची मदत घेतो, मात्र त्याला सुद्धा काही मर्यादा असते. शिवाय पर्सनल लोनच्या घेण्याच्या अटी सुद्धा खूपच कडक असतात, शिवाय त्याचा व्याजदर देखील खूपच जास्त असतो.
अशावेळी एक कर्ज असे आहे की, जे कोणत्याही त्रासाशिवाय आणि सहजरित्या आपल्या आर्थिक गरजा भागवू शकते, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यासाठी सिबिल स्कोअरची (CIBIL Score) सुद्धा अट नसते, कोणत्याही इन्कम प्रूफची गरज नाही, आणि त्या कर्जाचा व्याजदर सुद्धा खूपच कमी असतो. आम्ही गोल्ड लोनबद्दल बोलत आहोत.. (Loan without CIBIL Score)
गोल्ड लोन म्हणजे काय? Loan without Cibil Score Take a Gold lone
गोल्ड लोन म्हणजे तुमच्या घरातील सोने तारण ठेवून अल्पमुदतीच्या गरजांसाठी हे कर्ज घेतले जाते. जसे की, मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबावर आलेले कसल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती. तसे पाहता गोल्ड लोनचा व्याजदर हा 10 टक्क्यांपेक्षा कमी असतो. कारण म्हणजे, गोल्ड लोन हे बँका आणि एनबीएफसीसाठी पूर्णपणे सुरक्षित असते. म्हणजे की, हे कर्ज घेण्यासाठी तुमच्या घरात ठेवलेले सोने तारण म्हणून बँकेत किंवा एनबीएफसी कंपन्यांत ठेवावे लागते, मात्र काळजी करू नका, कारण बँकेमध्ये तारण म्हणून ठेवलेले सोने घरात ठेवण्यापेक्षा जास्त सुरक्षित असते
गोल्ड लोन घेण्यासाठी सिबिलची गरज नसते
गोल्ड लोन घेण्यासाठी सिबिल स्कोअरचा रेकॉर्ड तपासण्याची गरज नसते. तुमचे सिबिल स्कोअर खराब जारी असले तरी तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. शिवाय, या कर्जाच्या माध्यमातून तुम्ही अगदी वेळेत गोल्ड लोनची परतफेड करून तुमचे सिबिल स्कोर सुद्धा सुधारू शकता. गोल्ड लोन घेण्यासाठी जास्तीत जास्त १ ते २ दिवस लागतात. गोल्ड लोन अंतर्गत तुम्हाला 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊन तुमच्या गरजेनुसार या कर्जाच्या रकमेचा वापर करता येतो.
गोल्ड लोनवरील व्याजदर किती असतो?
सर्व साधारणत: गोल्ड लोनवर १० ते ११ टक्के दराने व्याज लागते आणि ते कर्ज एक ते तीन वर्षांकरिता घेता येते. तुमच्या तारण ठेवलेल्या प्रत्येक ग्रॅम सोन्याच्या बदल्यात तुम्हाला जवळपास 2000 रुपयांचे कर्ज मिळते. लक्षात ठेवा सोन्याच्या शुद्धतेनुसार त्याचे प्रमाण कमी-अधिक होऊ शकते. जवळ-जवळ सर्वच सरकारी बँका आणि एनबीएफसी कंपन्या सोने तारण ठेवून गोल्ड लोन देत असतात, मात्र तुम्ही तुमच्या आपल्या सोयीनुसार नामांकित बँकेची किंवा संस्थेची निवड करावी.