मनोज आव्हाडाला मारतानाचा व्हिडिओ पाहून औरंगाबाद कर सुन्न.

चोरीच्या संशयावरून माणवतेलाही लाजवेल एवढ्या क्रूरपणे मनोजची हत्या करण्यात आली. मारहाणीच्या या घटनेमुळे औरंगाबाद हादरला आहे. विशेष काही आरोपी मारत असताना इतर आरोपींनी या मारहाणीचे व्हिडिओ तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे घटनेतील क्रौर्य अधिकच ठळकपणे दिसून आले.

मारहाण नंतर मनोजला घातले स्नान

चोरीच्या संशयावरून मनोज आव्हाडची हत्या केल्यानंतर आरोपींनी अत्यंत शांतपणे मनोजच्या अंगावरील फाटलेले कपडे, रक्ताचे डाग पाहून डॉक्टरांना संशय येऊ नये, यासाठी त्याला स्नान घातले.

मनोजला मारहाण करताना देत होते घोषणा

मनोजला मारहाण करताना मारेकरी ‘मांगीरबाबा की जय’ अशा घोषणा देत होते. त्यांच्यापैकी काही जण मनोजच्या डोक्याला आणि खांद्याला मारू नका, असे सुद्धा म्हणत होते.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मारहाणीचा व्हिडिओ मृत मनोजच्या मोठ्या भावाला पाठवला होता. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. मनोजच्या आईच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Similar Posts