एका व्यक्तीने स्वतःची ओला इलेक्ट्रिक स्कूटर पेटवली, कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल

जेव्हापासून ओलाने इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे, तेव्हापासून कंपनीच्या अडचणी वाढत आहेत. त्याचबरोबर काही ग्राहक स्कूटर आणि कंपनीच्या कार्यशैलीला इतके कंटाळले आहेत की ते स्वत:च्या हाताने पेटवत आहेत किंवा गाढवाला बांधलेली स्कूटर ओढत नेत आहेत.

गेल्या आठवड्यात ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या दोन घटना घडल्या होत्या.

इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करण्यास सरकार कडून बंदी; वाचा सविस्तर..

तामिळनाडूतून एक ताजे प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने स्वतः त्याच्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरला पेट्रोल टाकून पेटवून दिले. तामिळनाडूतील अंबूर शहरातील रहिवासी असलेले पृथ्वीराज गोपीनाथन म्हणाले की त्यांच्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरला सतत समस्या येत होत्या. ग्राहक सेवाकेंद्र ऐकून सुद्धा समस्या सोडवण्याची काळजी करत नाही. त्यामुळे संतापलेल्या पृथ्वीराजने स्वतः त्याच्या ओला स्कूटरवर पेट्रोल टाकून पेटवून दिले. ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग लावण्याआधी पृथ्वीराजने कंपनीशी विविध स्तरांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही.

इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करण्यास सरकार कडून बंदी; वाचा सविस्तर..

बॅटरी अचानक डिस्चार्ज झाली

पृथ्वीराज यांनी ओला स्कूटर कंपनीला ई-मेलही लिहित म्हणाले की, मी तुमच्याकडे चौथ्यांदा तक्रार करत आहे. या ई-मेलमध्ये त्यांनी 15 एप्रिल रोजी ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या तक्रारीचा स्क्रीनशॉटही जोडला आहे. त्याने लिहिले की, बॅटरी अचानक डिस्चार्ज झाली. बॅटरी आधी 20 टक्क्यांपर्यंत चार्ज होती आणि नंतर अचानक ती शून्य टक्के झाली. त्याने ई-मेलमध्ये असेही लिहिले की, मी तुमच्या मूर्ख आणि निरुपयोगी कस्टमर केअरला फोन केला, पण तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पृथ्वीराजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर त्याच्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा जळणारा फोटो आणि व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. त्याने लिहिले की बराच वेळ वाट पाहिली. मी तुमच्या सेवेला कंटाळलो आहे. आता ते तुम्हाला दाखवण्याची वेळ आली आहे. धन्यवाद.

पाहा व्हिडिओ…

सचिनने त्याची स्कूटर गाढवाने ओढली

यापूर्वी महाराष्ट्रात सचिन गित्ते नावाच्या व्यक्तीने ओला स्कूटर चांगली कामगिरी न केल्याने आणि कंपनीकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने गाढवाने स्कूटर ओढली होती. भविष्यात कोणीही ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू नये, असे आवाहनही त्यांनी लोकांना केले.

पाहा व्हिडिओ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!