राज ठाकरेंना पुन्हा कोरोनाची लागण, आजची शस्त्रक्रिया पुढे ढकलली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर आज लिलावती रुग्णालयामध्ये पायावर शस्त्रक्रिया होणार होती. कोरोनाची लागण झाल्यामुळे ती शस्त्रक्रिया सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
राज ठाकरे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना यापूर्वी सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयामध्येच दाखल करण्यात आलं होतं.
लसीचे दोन डोस घेऊनसुद्धा कोरोना
कोविड-डेड-सेलमुळे ॲनेस्तेशीया (भुल) देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरे यांची पायावरची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे आणि त्यांच्या आई यांचे कोरोना लशीचे दोन्ही डोस पूर्ण झाले होते.
मास्क वापरण्यास राज ठाकरेंचा वेळोवेळी नकार
राज ठाकरे हे गेल्या दोन वर्षात वेळो-वेळी मास्क वापरण्यास नकार देताना व विना मास्क फिरताना दिसून आले. ते गर्दीतही विनामास्क वावरत असतात. त्यामुळे त्यांना कोरोना होण्याची शक्यता जास्त होती आणि आत्ता तेच झालं आहे. त्यामुळे त्यांनी आत्ता तरी काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईतही कोरोना रुग्ण वाढले
राज्यासह मुंबईतसुद्धा कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. काल 506 नवे कोरनाचे रुग्ण आढळल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. तर एकूण 2526 सक्रिय कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आहेत.