Tata Punch EV Price 2024:भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV कार अखेर झाली लॉन्च! एका चार्ज मध्ये पुण्याहून मुंबई रिटर्न..
Tata Punch EV Price 2024: इलेक्ट्रिक कार घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एक खुशखबर आहे व महत्त्वाची बातमी देखील ती म्हणजे देशामधील सर्वात मोठी प्रवासी वाहन निर्मिती कंपनी म्हणजे टाटा या कंपनीने मोठा धमाका केलेला आहे.
टाटा ने आता टाटा पंच इलेक्ट्रिक कार लॉंच केली आहे हे आपल्याला माहीतच असेल तसे पाहता या गाडीसाठी आधीच अधिकृत बुकिंग सुरू झालेले आहे. या गाडीची बुकिंग आपण फक्त एकवीस हजार रुपये टोकन अमाऊंट देऊन बुकिंग करू शकतो (electric car). दरम्यानच्या कालावधीत आज ही गाडी अधिकृतपणे विक्रीसाठी लॉन्च केलेली आहे. Tata Punch EV Price 2024
विशेष भाग म्हणजे देशभरातील कित्येक डीलर्स कडे ही गाडी पोहोचू लागले आहे. आजपासूनच या गाडीची टेस्ट ड्राईव्ह सुरू होईल; परंतु या गाडीची डिलिव्हरी ही लवकरात लवकर सुरू होणार आहे.
या महिन्याच्या अखेरपर्यंत या गाडीची डिलिव्हरी देशभरातील अंदाजे सर्वच शहरांमध्ये सुरू होईल अशी माहिती मिळाली आहे (electric car updates). अशा परिस्थितीमध्ये आता आपण टाटा इलेक्ट्रिक पंपाची किंमत किती असेल तसेच या गाडीचे फीचर्स काय असतील याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
किती वॅरीयंटमध्ये उपलब्ध होणार टाटा पंच इलेक्ट्रिक
कंपनीने लॉन्चिंग वेळी दिलेल्या महत्त्वाच्या माहितीप्रमाणे ही गाडी पाच व्हेरियंट मध्ये उपलब्ध होईल: स्मार्ट, स्मार्ट प्लस, एम्पावर्ड, प्लस एडवेंचर, एम्पावर्ड; अशा पाच व्हेरिएंट मध्ये ही गाडी उपलब्ध होईल. दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅक सह दोन विविध ड्रायव्हिंग पावर ट्रेन देखील असेल तसेच, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही देशभरातील सर्वात सुरक्षित अशी इलेक्ट्रिक व्हेईकल कार आहे, असा कंपनीचा दावा आहे.
टाटा ने लॉन्च केलेली ही नवीन इलेक्ट्रिक कार Acti.ev वर चालणारी पहिलीच इलेक्ट्रिक आकार असेल; यामध्ये एकाधिक बॅटरी पॅक तसेच ड्रायव्हिंग रेंज सुविधा दिलेली आहे. पंच इलेक्ट्रिक व्हेईकल बद्दल माहिती सांगायची झाल्यास, ही एसयूव्ही लॉंग रेंज तसेच स्टॅंडर्ड मध्ये सर्वत्र ऑफर केली जात आहे. Tata Punch EV Price 2024
यामध्ये लॉंग रेंज व्हेरिएंट मध्ये तीन ट्रीम्स यासोबतच स्टॅंडर्ड रेंज व्हेरिएंट मध्ये पाच ट्रिम्स याचा समावेश असेल; कंपनी या एसयुव्ही सोबत 3.3 किलोमीटर इतक्या क्षमतेचा वॉल बॉक्स चार्जर ग्राहकांना देत आहे. ही एसयूव्ही सनरूप तसेच विदाऊट समरूप अशा दोन्ही पर्यायांसोबत उपलब्ध असेल.
या नव्या लॉन्च करण्यात आलेल्या कार मध्ये कंपनीने दोन विविध बॅटरी पॅक दिलेले आहेत. यामधील 25kWh बॅटरी पॅक ची कार एकच चार्जिंग मध्ये तब्बल 315 किलोमीटर पर्यंत ची रेंज येत आहे, तर 35kWh क्षमतेची बॅटरी या ठिकाणी एकाच चार्ज मध्ये 421 किलोमीटर पर्यंत रेंज देत असल्याचा दावा स्वतः कंपनी करत आहे.
Tata Punch EV Price 2024
आकर्षक लोक तसेच शक्तिशाली बॅटरी पॅक सह सुसज्ज अशा टाटा पंच इलेक्ट्रिक व्हेईकल ची सुरुवातीची किंमत सध्या बघितली तर 10.99 लाख रुपये इतकी आहे. याची टॉप व्हेरियंट साठी कार आहे, त्याची किंमत 14.99 लाख रुपये पर्यंत जाईल (एक्स-शोरूम). कंपनीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार, स्मार्ट व्हेरिएंटल ची किंमत 10.99 लाख रुपये इतकी ठेवली आहे.
स्मार्ट प्लस गाडीची किंमत आपण बघितली तर 11.49 लाख रुपये आहे; तरी एडवेंचर वेरियंट दोन बॅटरी पॅक मध्ये येत आहे. यामध्ये 35kWh बॅटरी पॅक व्हेरियंटची किंमत 12.99 लाख रुपये तर 25kWh बॅटरी पॅक बेरियंट ची किंमत 11.99 लाख रुपये इतकी आहे. अशा वेळेस एम्पावर्ड वेरियंट सुद्धा दोन बॅटरी पॅक मध्ये येत असतात. Tata Punch EV Price 2024
यामध्ये अधिक रेंजच्या बॅटरी पॅक मॉडेल ची किंमत आपण बघितली तर 13.99 लाख रुपये इतकी आहे; तर कमी रेंजच्या बॅटरी पॅक मॉडेलची किंमत 12.79 लाख रुपये इतकी आहे. एम पावर प्लस हे व्हेरियंट सुद्धा दोन बॅटरी पॅक मध्ये लॉन्च केले आहेत.
यामध्ये लॉंग रेंज बॅटरी पॅक बेरियंट ची किंमत सर्वसाधारणपणे 14.49 लाख रुपये तसेच कमी रेंजच्या बॅटरी पॅक व्हेरियंटची किंमत सर्वसाधारणपणे 13.29 लाख रुपये इतकी आहे. या सर्व किमती एक्स शोरूम मधील आहेत तरी याची खात्री करून घ्यावी.