हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची.

कन्नड तालुक्यातील औराळा इथे हर्षवर्धन जाधव यांची सभा सुरु होती. सभा संपल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. नंतर या वादाला धक्काबुक्कीचे स्वरुप आले. गावातील काही तरुणांच्या मध्यस्थीने अखेर काही काळाने हे वातावरण शांत झाले.

कन्नड तालुक्यातील औराळा येथे मा. आ. हर्षवर्धन जाधव त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची होऊन वादास सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळासाठी औराळ्यातील वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले होते. येथील आठवडी बाजारात देखील या धक्काबुक्कीचे पडसाद उमटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!