उद्या औरंगाबादमध्ये मिळणार 54 रुपयात एक लिटर पेट्रोल; जाणून घ्या काय आहे कारण…
उद्या औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान 54 रुपये प्रती लिटर दराने पेट्रोल मिळणार आहे.
सध्या पेट्रोलच्या वाढत्या किमतीने सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच जर तुम्हाला कुणी सांगितले की अवघ्या 54 रुपये प्रति लिटर प्रमाणे पेट्रोल मिळणार आहे तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, उद्या औरंगाबादमध्ये 54 रु प्रति लिटर या दराने पेट्रोल मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे हे पेट्रोल मनसे तर्फे मिळणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मनसे तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 54 रुपये प्रति लिटरने पेट्रोल देण्याचा निर्णय मनसे तर्फे घेण्यात आला असल्याच मनसे जिल्हाध्यक्ष श्री सुमित खांबेकर यांनी सांगितले.
उद्या सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामधील पेट्रोल पंपावर प्रत्येकी 1 लिटर पेट्रोल 54 रुपये लिटरने दिले जाणार असल्याचे सुमित खांबेकर म्हणाले. त्यामुळे उद्या कमी किमतीमध्ये पेट्रोल घेण्यासाठी मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.
राज ठाकरेंनी केलं मनसैनिकांना आवाहन
“माझ्या वाढदिवसानिमित्त कुणीही मला भेटायला येऊ नये, जिथे आहात तिथूनच शुभेच्छा द्याव्या” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांना आवाहन केले आहे.
समाज माध्यमांवर एक ऑडिओ पोस्ट करून राज ठाकरेंनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे. या ऑडियो मध्ये राज ठाकरे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलते आहे. मध्यल्या काळात रुग्णालयात दाखल झालो पण कोरोनाचे सेल्स सापडल्यामुले शस्त्रक्रिया रद्द झाली. आता ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडणार आहे. आता पुन्हा तोच प्रकार व्हायला नको, म्हणून यावेळी वाढदिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या”,