Drone subsidy | ड्रोन खरेदीसाठी सरकारकडून 100 टक्के अनुदान, योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज..
Drone subsidy: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, त्याच्या घरात सुखा-समाधानाचे दिवस यावेत, यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजना राबवत असतात. सरकार योजनांद्वारे शेतकऱ्यांना कमी किंमतीत बियाणे, खते, कृषी उपकरणे पुरवली जातात. शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारने ड्रोन शेतीला प्राधान्य दिले आहे.
शेती उपकरणांच्या किंमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने, महागडी उपकरणे घेऊन शेती करणं शेतकऱ्यांना शक्य नाही. सरकार ड्रोन खरेदीसाठी अनुदान देत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशावरचा भार कमी होणार आहे. आधुनिक यंत्रामुळे शेतकऱ्यांचे काम सोपे होऊन उत्पादनात वाढ होते. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
याप्रकारे अनुदान मिळणार..Drone subsidy
Kisan Drone Yojana कृषी पदवी असलेल्या तरुणांना ड्रोनसाठी 5 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. यामुळे तरुणांना व्यवसाय देखील सुरू करता येईल. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी संस्थांना अनुदान दिले जाणार आहे. (PM Drone Yojana)
विद्यापीठे व सरकारी संस्थांना ड्रोन खरेदीसाठी व त्यांचे भाग खरेदीसाठी 100 टक्के म्हणजेच 10 लाख रुपये रक्कम मिळणार आहे. शेतकरी उत्पादक संस्थांना 75 टक्के म्हणजेच 7 लाख 50 हजार रुपये एवढे अनुदान मिळेल. (Drone Anudan Yojana)
Pradhan Mantri Drone Yojana ड्रोन खरेदी न करता काही संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास प्रति हेक्टर 6 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. प्रात्यक्षिके राबविणाऱ्या सबंधित यंत्रणेला ड्रोन प्रात्यक्षिके राबविल्यास त्यांना 3 हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते.
अवजारे सेवा सुविधा केंद्रांना ड्रोन खरेदीसाठी ड्रोन किंमतीच्या 40 टक्के म्हणजे 4 लाख रुपये अनुदान दिले जाते. कृषी पदवीधारकांना अवजार सेवा केंद्र सुरू केल्यास ड्रोन किंमतीच्या 50 टक्के म्हणजेच 5 लाख रुपये अनुदान मिळेल. (agriculture drone subsidy in maharashtra)
योजनेची पात्रता
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
अर्जदार हा कृषी पदवीधारक असावा.
कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादन संस्था, कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था, कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था इत्यादी या योजनेसाठी पात्र आहेत. (Drone Anudan Yojana Maharashtra)
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Drone subsidy documents
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- बॅंक पासबुक
- पूर्व समंती पत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
- अर्जदाराची संस्था असल्यास संस्थेचा पुरावा
योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज.. how to apply for Drone subsidy
ड्रोन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावयाचा आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करायचा आहे.
हे देखील वाचा-
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- आता सातबारा काढा मोबाईलवरून घरबसल्या, कसा काढायचा जाणून घ्या..