Anganwadi Bharti 2023 | अंगणवाड्यांमध्ये पदभरती सुरु! जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर.

Anganwadi Bharti 2023

Anganwadi Bharti 2023 बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविकांची भरती घेण्यात आली नव्हती. महाराष्ट्र सरकारने सध्या टप्या टप्याने भरती घेण्यास सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीची सुरूवात सोलापूर जिल्ह्यापासून होत आहे. तरी या लेखामध्ये आपण अंगणवाडी सेविकांच्या भरतीची पुर्ण माहिती घेणार आहोत. तरी हा लेख पुर्ण वाचावा. म्हणजे तुम्हाला काही अडचण तसेच प्रश्न राहणार नाहीत. तसेच काही प्रश्न असल्यास लेखाच्या खाली कमेंट करा तीथे तुम्हाला उत्तर दिले जाईल. Anganwadi vacancy 2023

एकुण पदे-

सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांवरील १८६ सेविका व जवळपास ७५० मदतनीस.

अर्ज करावयाची तारीख-

पदांची भरती ३० एप्रिलपर्यंत केली जात आहे. सांगोला, कोळा, करमाळा तालुक्यातील पदभरतीसाठी २५ मार्चपर्यंत तर सोलापूर शहर, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट येथील पदभरतीसाठी २१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत असून उर्वरित तालुक्यातील भरती प्रक्रिया १५ मार्चपासून सुरु होणार असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ५ एप्रिलपर्यंत मुदत असणार आहे.

जाहिरातीची पी.डी.एफ. (PDF) कॉपी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Anganwadi Bharti 2023 साठी अर्ज कोठे करावा?

सोलापूर, बार्शी नागरी प्रकल्प आणि सोलापूर-अक्कलकोट नागरी प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ. विजय खोमणे यांच्या सोलापुरातील अंत्रोळीकर नगरातील आर्किटेक कॉलेजशेजारील कार्यालयाकडे संबंधित उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. त्याचप्रमाणे पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, सांगोला या तालुक्यांच्या शहरी भागातील महिला उमेदवारांना पंढरपूर शहरातील बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा पाटील यांच्या कार्यालयात अर्ज करावा लागेल. Anganwadi Bharti 2023

तसेच शहरातील प्रकल्प एक अंतर्गतचे अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव यांच्या सुपर मार्केटवरील कार्यालयात अर्ज करावे लागतील. दरम्यान, सोलापूर, पंढरपूर व बार्शी येथील काही शहरी भागाचे अर्ज नागरी प्रकल्प-दोन कार्यालय, रंगभवन ख्रिश्चन हौसिंग सोसायटी येथे अर्ज करावे लागतील. https://solapur.gov.in/ या संकेतस्थळावर भरतीची संपूर्ण माहिती व अर्ज उपलब्ध आहे. त्यावरून अर्ज डाऊनलोड करून त्यातील माहिती व आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित बालविकास अधिकारी कार्यालयात मुदतीत तो जमा करायचा आहे.

जाहिरातीची पी.डी.एफ. (PDF) कॉपी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Anganwadi Bharti 2023 साठी निवड प्रक्रिया कशी असेल?

शासनाच्या निर्णयानुसार उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रिकेतील टक्केवारीच्या आधारावर ७५ गुण दिले जातील. तर दुसरीकडे विधवा किंवा अनाथ उमेदवारास दहा गुण, अनुसूचित जाती-जमातीसाठी दहा गुण, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवाराला पाच गुण आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून यापूर्वी कामाचा अनुभव असल्यास पाच गुण मिळणार आहेत. या प्रक्रियेत ज्या उमेदवारास सर्वाधिक गुण, त्याचीच निवड होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!