Bhumi Land Records Maharashtra: आता 1880 पासूनचे सर्व फेरफार, सातबारा, आणि खाते उतारे तपासा ऑनलाइन! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Bhumi Land Records Maharashtra: तुम्हाला जर कुठल्या जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असेल तर त्या जमिनीचा संपूर्ण मूळ इतिहास जाणून घेणे म्हणजेच मुळात ही जमीन कोणाची होती आणि कालांतराने त्यात कोणते बदल झाले आहेत या सर्व गोष्टी जाणून घेणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु ही सगळी माहिती 1880 पासूनचे सातबारा, फेरफार, खाते उतारे व भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध आहे. Bhumi Land Records Maharashtra

Bhumi Land Records Maharashtra
Bhumi Land Records Maharashtra

Bhumi Land Records Maharashtra

मात्र आता सरकारने ही सगळी माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. ही सुविधा याआधी फक्त 7 जिल्ह्यांपर्यंतच मर्यादित होती. मात्र आता राज्यभरातील 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा दिली जात आहे. यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छ. संभाजीनगर (औरंगाबाद,) चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशीम, यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश होत आहे.

जमिनीचा नकाशा ऑनलाइन कसा पाहायचा? | How to view land map online?

ई-रेकॉर्ड कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सुमारे 30 कोटी जुने रेकॉर्ड असणारे उतारे उपलब्ध करून देणार आहे. परंतु, हे रेकॉर्ड कसे पहावेत याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसते, आणि आजच्या या लेखात आपण याविषयीचीच अधिक माहिती पाहणार आहोत.

जमिनीच्या जुन्या नोंदी कशा पहायच्या? | How to view old land records?

  • जुने रेकॉर्ड मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला aapleabilekh.mahahumi.gov.in वर सर्च करावे लागेल. यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाइट तुमच्यासमोर उघडेल.
  • येथे तुम्हाला e-Records (संग्रहित दस्तऐवज) नावाचे एक पेज दिसेल, या पेजवर उजव्या बाजूला असलेल्या भाषा पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.
  • तुम्ही या वेबसाइटवर आधीच रजिस्टर केले असल्यास, तुम्ही तुमचा लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून या साइटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.
  • परंतु, जर तुम्ही या साईट वर पहिल्यांदा आला असाल, तर सर्वप्रथम तुम्हाला येथे नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल, आणि तुम्ही इथे क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म उघडेल. याठिकाणी तुम्हाला सुरुवातीला तुमची वैयक्तिक माहिती योग्य रीतीने द्यावी लागेल. यामध्ये तुमचे नाव, मधले नाव आणि आडनाव येते, यानंतर लिंग (पुरुष किंवा महिला), राष्ट्रीयत्व आणि नंतर मोबाईल क्रमांक द्यावा लागेल.
  • त्यांनतर तुम्हाला सांगावे लागेल की तुम्ही काय काम करता, जसे की व्यवसाय, नोकरी किंवा इतर काही. यानंतर तुम्हाला तुमचा मेल-आयडी आणि जन्मतारीख लिहावी लागेल.
  • वैयक्तिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या पत्त्याची माहिती द्यावी लागेल. यामध्ये घराचा क्रमांक, मजला क्रमांक (तुम्ही कोणत्या मजल्यावर राहता), इमारतीचे किंवा घराचे जे नाव असेल ते टाईप करा. Bhumi Land Records Maharashtra
  • यानंतर तुम्हाला पिन कोड टाकावा लागेल. पिन कोड टाकल्यानंतर फॉर्मवर जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव तुम्हाला आपोआप दिसेल. यापुढे रस्त्याचे नाव, तुमच्या गावाचे नाव, सोबतच तालुक्याचे नाव तुम्हाला इथे टाकावे लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला लॉगिन-आयडी तयार करावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला कॅप्चा टाइप करावा लागेल. म्हणजेच येथे दाखविलेल्या संख्या किंवा अक्षरे त्याच्या पुढील चौकटीत आहे तशाच प्रकारे लिहाव्या लागतील. हे सर्व झाल्यानंतर शेवटी सबमिट बटण दाबा.
  • यानंतर तुमच्या स्क्रीनवर युजर रजिस्ट्रेशन यशस्वीपणे कम्प्लीट झाले असे दाखवण्यात येईल, पुढे लॉग इन करण्यासाठी येथे क्लिक करा असा एक मेसेज दिसेल, तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला रजिस्ट्रेशन दरम्यान टाईप केलेले युजर आयडी आणि पासवर्ड वापरून पुन्हा लॉग इन करावे लागेल.

आता फेरफार उतारा कसा बघायचा ते आपण बघुया. | Bhumi Land Records Maharashtra

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जिल्हा निवडावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला तालुका, गावाचे नाव आणि रेकॉर्ड प्रकार निवडावा लागेल. यामध्ये कोणता उतारा तुम्हाला हवा आहे ते निवडायचे आहे. त्यामधे सुमारे 58 प्रकारच्या विविध नोंदी उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही तुम्हाला हवं असलेल्या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर ग्रुप नंबर टाकून सर्च ऑप्शनवर क्लिक करा.
  • यांनतर तुम्हाला फेरफार संबंधित माहिती दाखवली जाईल. तेथे याचे वर्ष आणि क्रमांक दोन्ही दिलेल असतं. तुम्हाला हव्या असणाऱ्या वर्षातील झालेले बदल पाहण्यासाठी तुम्ही त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला समोरील add to cart पर्याय निवडून रिव्ह्यू कार्ट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुमची कार्ट तुमच्या ओपन होईल आणि त्यांनतर तुम्हाला खालील Continue या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि त्यांनतर Download Summary नावाचे पेज उघडेल, जिथे तुम्हाला तुमची फाईल दिसेल.
  • पुढे View File या पर्यायावर क्लिक करताच, 1982 फेरफार खात्याची माहिती तुमच्या समोर दिसेल. ते डाउनलोड करण्यासाठी या शीटवरील खाली बाण असलेल्या चिन्हावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्ही 1982 चा फेरफार बदल पाहू शकता, त्याचबरोबर जमिनीच्या हक्काच्या नोंदींमध्ये केव्हा आणि कुठे बदल झाले याची माहिती सुद्धा त्यात असते.

त्याचप्रमाणे, तुम्ही इतर रेकॉर्ड प्रकार निवडला देखील इथे पाहू शकता. Bhumi Land Records Maharashtra

Similar Posts