मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आजपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर, राहणार 1200 पोलिसांचा फौजफाटा तैनात..!
मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येत असून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकरीता तब्बल 1200 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात राहणार आहे. यामध्ये 50 अधिकाऱ्यांचा देखील समावेश असेल..
औरंगाबाद जिल्ह्यातील शिंदे गटामध्ये गेलेल्या पाच आमदारांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून या मेळाव्यामध्ये शिवसैनिकांची गर्दी पाहण्यासारखी असेल, असा दावा केला जात आहेत. आज शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदे यांचे औरंगाबाद शहरामध्ये आगमन होणार असून उद्या रविवारी दिवसभर ठिक-ठिकाणी भेटी-गाठी आणि मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे जिथे-जिथे जाणार आहेत, त्या-त्या स्थळी आणि मार्गावर आज सकाळपासूनच बंदोबस्ताची तालीम करण्यात येणार आहे.
दोन दिवसात उरकणार अनेक कार्यक्रम
मुख्यमंत्री दोनच दिवस औरंगाबादेत येत असले तरीही या वेळेत भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिंदे गटात समाविष्ट झालेले आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, संदिपान भूमरे यांच्या कार्यालयांना भेट देणार देऊन क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकांना अभिवानदन करून गुरुद्वाऱ्याला सुद्धा भेट देतील. याबरोबरच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामध्ये वैजापूर आणि सिल्लोडमधील मेळाव्यात जबरदस्त शक्तिप्रदर्शन करण्यात येण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता
मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्या दरम्यान शहरातील पोलीस दल सज्ज असून हा दौरा शांततेमध्ये पार पडेल. विरोधकांना निषेध व्यक्त करण्याचा अधिकार असतो. मात्र मुख्यमंत्री हे संविधानिक असल्यामुळे कुठल्याही बेकायदेशीर मार्गाने त्यांना विरोध करणे अपेक्षित नाही. आम्ही सध्या कुणालाही नोटीसा दिलेल्या नाहीत. औरंगाबाद शहरातील राजकीय नेते आणि नागरिकांकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा असल्याचं पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सर्वाधिक शिवसेनेचे बंडखोर आमदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंचा हा औरंगाबाद दौरा महत्त्वाचा समजला जातोय.
अशी असणार दौऱ्याची रूपरेखा…