Video: काय झाडी, काय डोंगर, काय हा च्या मीम्सनंतर आता गाण्याचा धुमाकूळ..

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… एकदम ओक्केमधी हाय..’ हा डायलॉग सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होतोय. शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डिंगमधलं हे वाक्यं आता लईच व्हायरल झालंय.

एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यावर शिवसेनेचे 47 आमदार शिंदेंसोबत केले त्यातले एक म्हणजे शहाजीबापू पाटील. त्याच्या व्हायरल झालेल्या मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमुळे सध्या ते खूपच चर्चेत आले आहेत. त्यांच्या ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… एकदम ओक्केमधी हाय..’ या डायलॉगवर आता चक्क गाणं सुद्धा बनवलं गेलं आहे. मराठी यूट्यूबर शंतनू पोळे याने शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगला संगीत देऊन हे गाणं तयार केलं आहे. हे गाणंही आता सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल झालंय…

शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील एक ध्वनिफीत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. ‘मी सध्या गुवाहाटीत आहे,’ ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये आहे…’ अशा शब्दांत आपली खुशाली संबंधित आमदार आपल्या एका कार्यकर्त्यास फोनवरून सांगत असल्याबाबतची ही कॉल रेकॉर्डिंग आहे. यानंतर ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये…यावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

मीम्स व्हायरल झाल्यानंतर आता ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये’…यावर गाणं आलं आहे.

पाहा व्हिडिओ..

Similar Posts