हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, राज्यात ‘या’ जिल्ह्यांत पडणार जोरदार पाऊस..
मागील काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा खूप वाढला आहे. विदर्भात तर उष्णतेची लाट आली आहे. मात्र, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एकीकडे तापमानाचा पारा वाढलेला असताना सुद्धा राज्यात परत पावसाचं आगमन होणार आहे.
कुठे पडणार पाऊस जाणून घ्या:
महाराष्ट्रातील कोकण व कोल्हापूर जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये आजपासून 3 ते 4 दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
येत्या चार ते पाच दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. के. एस. होसाळीकर यांनी याबाबतचे महत्वाचं ट्वीट केलं आहे.
एप्रिल महिन्यामधील 5 तारीख म्हणजेच उद्या कोकणमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर पश्चिम महाराष्ट्रामधील सातारा आणि कोल्हापुरमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट करण्यात आला आहे. तसेच 6 एप्रिलला सुध्दा या चारही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाट होऊन पाऊस पडू शकतो. कोकणातील नागरिकांना गर्मीपासून दिलासा मिळणार आहे.
तर दुसरीकडे मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट अधिक आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तापमानात ही वाढ कायम आहे. उत्तरेकडून उष्ण हवेचे झोक महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे. राज्यातील हवामान कोरडे आहे. तसेच आकाशातील सामान्य स्थितीमुळे तापमानातील वाढ कायम आहे.