राज ठाकरेंच्या सभे विरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळत याचिकार्त्याला ठोठावला १ लाखांचा दंड

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे १ मे २०२२ रोजी होणारी जाहीर सभा सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चेत आहे. आधी सभेला परवानगी मिळवण्यावरून वाद सुरू होता. आता परवानगी मिळाल्यानंतर सभेला विरोध केला जात असून पोलिसांनी घातलेल्या अटींची अंमलबजावणी आणि जातीय तेढ निर्माण होण्याच्या मुद्द्यावरून आक्षेप घेतला जात आहे.

या पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठासमोर दाखल केलेली जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावत याचिकाकर्त्याला एक लाखांचा दंड ठोठावला आहे.

रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हा प्रमुख जयकिशन कांबळे यांनी औरंगाबाद खंडपीठा समोर राज ठाकरे यांच्या सभेविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. सभा रद्दच करण्यात यावी, अशी ठाम मागणी करतानाच सभा झालीच, तर पोलिसांच्या अटींचं काटेकोर पालन होणं आवश्यक असल्याची भूमिका जयकिशन कांबळे यांनी याचिकेमधून मांडली होती.

मात्र न्यायालयाने ही याचिकाच फेटाळून लावली. ही जनहित याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत पुढील 3 दिवसांमध्ये 1 लाख रूपये भरण्याचे आदेश सुद्धा खंडपीठाने दिले आहेत.

आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी १ तारखेला राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा उधळून लावू या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत. कालच आम्हाला कळलं की राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचं जर राज ठाकरेंनी उल्लंघन केलं, तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील. आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही. पण जो भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागेल, त्याच्याविरुद्ध आम्ही आहोत”, असं ते म्हणाले.

दोन समाजात तेड निर्माण होत असेल तर भाषण तपासावे

दोन दिवसांवर रमजान ईद आली आहे. ऐतिहासिक औरंगाबादमध्ये जी सभा होत आहे त्याला आमचा विरोध नाही. पण दोन समाजात तेढ निर्माण होत असेल तर पोलिसांनी राज ठाकरे यांचं भाषण तपासावं. अन्यथा महाराष्ट्र पेटू शकतो. त्यामुळे यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाकडून करण्यात आली होती.

Similar Posts