sbi recruitment 2023 : नौकरीची सुवर्णसंधी! SBI बॅंकेमध्ये 8,773 जागांसाठी भरती सुरू; या तारखेपर्यंत करा ऑनलाइन अर्ज
sbi recruitment 2023 तरुण युवकांसाठी आता सुवर्णसंधी कारण आम्ही घेऊन आलो आहोत एक अशी बातमी जी युवकांसाठी आनंददायी ठरेल. तर तरुण मित्रांनो तुम्हाला मिळत आहे बँकेत नोकरी करण्याची संधी ते सुद्धा भारतातल्या सर्वात मोठ्या बँकेत. जर तुमचे देखील स्वप्न बँकेत नोकरी करायची असेल तर हा लेख तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत वाचा (sbi recruitment 2023). कारण स्टेट बँक ऑफ इंडिया ने नुकत्याच तब्बल 8,773 पदांसाठी भरती काढलेले आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी व या भरतीचा लाभ घ्यावा.
अर्ज करण्याची मुदत sbi recruitment 2023
या भरतीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 17 नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे आणि तुम्ही 7 डिसेंबर 2023 पर्यंत या भरतीला अर्ज करू शकता. जर तुम्ही 7 डिसेंबरच्या आत अर्ज भरला नाही तर तुमचा अर्ज हा परत स्वीकारला जाणार नाही आणि तुम्ही या भरतीचा लाभ घेऊ शकणार नाही. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरावा (sbi recruitment 2023 apply online last date).
- संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
- पदाचे नाव – लिपिक (कनिष्ठ सहकारी)
- रिक्त जागा – 8773
- श्रेणी – सरकारी नोकरी
- अर्ज मोड – ऑनलाइन
- अर्ज करण्याच्या तारखा – 17 नोव्हेंबर ते 07 डिसेंबर 2023
- परीक्षा मोड – ऑनलाइन
- भरती प्रक्रिया प्रिलिम्स – मुख्य
- पगार – रु 26,000 – रु 29,000
- अधिकृत वेबसाइट – http://sbi.co.in/
https://sbi.co.in/web/careers
कमी सिबिल असल्यावर सुद्धा मिळेल कर्ज; जाणून घ्या कसं ?
वयोमर्यादा
अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2023 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी तर 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अर्थात , उमेदवारांचा जन्म हा 2 एप्रिल 1995 नंतरचा असावा .
वेगवेगळ्या प्रवर्गातील निकषांच्या आधारावर इच्छुक उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये खालीलप्रमाणे सूट देण्यात आलेली आहे . sbi recruitment 2023
- SC/ST – ५ वर्षे
- ओबीसी – ३ वर्ष
- PwBD (जनरल/ EWS)साठी – १० वर्षे
- PwBD (SC/ST) साठी – १५ वर्षे
- PwBD (OBC) साठी – १३ वर्षे
- विधवा, घटस्फोटित महिला – OBC करीता ३८ वर्षे आणि SC/ST उमेदवारांसाठी ४० वर्षे
- SBI चे प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी – SC/ST साठी – ६ वर्षे, OBC साठी – ४ वर्षे, GEN/EWS साठी – १ वर्ष, PwBD (SC/ST) – १६ वर्षे, PwBD (OBC) साठी – १४ वर्षे,
- PwBD (Gen/EWS) साठी – ११ वर्षे
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कोणती आहे
अर्जदार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असेल तर तो क्लर्क या पदासाठी अर्ज करू शकतो. याच्याशिवाय अर्जदाराचे वय हे 20 ते 28 वर्षे यांच्या दरम्यानच असले पाहिजे. OBC प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्याच्यासाठी वयोमर्यादा ही 3 वर्षे आहे आणि Sc/St प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षापर्यंत सूट दिली जाईल. sbi recruitment 2023
SBI लिपिक 2023 परीक्षेचा सारांश SBI Clerk 2023 Exam Summary (sbi recruitment 2023)
जर अर्जदार हा कलर्क पदासाठी अर्ज भरणार असेल तर त्याची निवड ही प्रिलम्स, मुख्य आणि स्थानिक भाषा या परीक्षांच्या आधारे केले जाईल (sbi recruitment 2023 apply online). त्यामध्ये प्रिलम्स परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल व त्याच्यामध्ये उमेदवाराला एका तासांमध्ये शंभर प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. या परीक्षेच्या सिल्याबसचा विचार केला तर 100 प्रश्नांमध्ये इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्कवितर्क या सर्व विषयांचा समावेश देखील असेल.
पहिले चरण : प्राथमिक परीक्षा निवड प्रक्रियेत ऑनलाइन टेस्ट (प्राथमिक व मुख्य परीक्षा) बरोबरच स्थानिक भाषेची टेस्टचा समावेश रहील .
ऑनलाइन प्राथमिक परीक्षेमध्ये १०० गुणांच्याप्रश्न असतील. सदर टेस्टचा कालावधी हा १ तास असून त्यात तीन विभाग आहेत.
- वरील चार्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक टेस्टची वेळ वेग वेगळी असेल.
- वस्तुनिष्ठ टेस्टमध्ये चुकीच्या उत्तरांकरिता नकारात्मक गुण अर्थातच चुकीच्या प्रश्नासाठी नियुक्त करण्यात आलेल्या गुणांपैकी 1/4 ) वजा करण्यात येतील.
- वैयक्तिक चाचण्यांकरिता अथवा एकूण गुणांकरिता कसलीही किमान पात्रता गुण निर्धारित करण्यात आलेले नाहीये.
- विभागनिहाय गुण राखले जाणार नाहीत.
अर्ज शुल्क
- उमेदवारांनी निर्धारित कालावधीमध्ये ऑनलाइन पेमेंट करणे गरजेचे आहे.
- अर्ज करण्याकरिता, जनरल, OBC व EWS श्रेणीमधील उमेदवारांकरीता अर्ज शुल्क म्हणून ७५० रुपये आकरण्यात आले आहे.
- आणि SC किंवा ST बरोबरच अपंग उमेदवारांकरिता अर्जाचे शुल्क पर्णतः मोफत आहे.
SBI Clerk 2023 अर्ज प्रक्रिया:
- स्टेप 1 : SBI लिपिक भरती परीक्षा नोंदणी करण्याकरिता अधिकृत वेबपोर्टलवर प्रवेश करण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) वेबसाइट http://sbi.co.in किंवा https://sbi.co.in/web/careers वर जा.
- स्टेप 2 : नोंदणी या पर्यायावर क्लिक करून तुमचे नाव, तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी बरोबर विचारण्यात आलेली आवश्यक सर्व माहिती भरून लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करा.
- स्टेप 3: तुम्ही तयार केलेले क्रेडेन्शियल्सचा उपयोग करून लॉग इन करा आणि नंतर ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक भरा. तिथे दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे तुमचे वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता बरोबरच इतर आवश्यक माहिती नमूद करा.
- स्टेप 4 : नंतर कागदपत्रांच्या प्रती स्कॅन करून अपलोड करा. (उदा. जसे कि, तुमचा फोटो, तुमची स्वाक्षरी आणि अर्जामध्ये नमूद केलेले इतर दस्तऐवज.) अपलोड केलेल्या फाइल्सचा आकार निर्धारित करून निकष पूर्ण करतात याची खात्री करा.
- स्टेप 5 : अर्ज शुल्क भरण्यासाठी पेमेंट विभागामध्ये जाऊन क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड, नेट बँकिंग बरोबरच इतर पेमेंट पद्धतींसह ऑनलाइन पेमेंट करता येईल.
- स्टेप 6 : पेमेंट केल्यानंतर अर्ज सबमिट करून भविष्यातील कामासाठी प्रिंट आउट काढून जतन करून ठेवा.