Agri Machinery Subsidy: ट्रॅक्टरवर 5 लाखांच्या अनुदानाबरोबरच इतर यंत्रांच्या अनुदानात मोठी वाढ, या योजनेचा असा घ्या लाभ…
Agri Machinery Subsidy :- शेतीच्या वेगवेगळ्या कामासाठी दिवसेंदिवस वेगवेगळ्या यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून शेतीच्या मशागतीपासून ते काढणीपर्यंत वेगवेगळे यंत्रे शेतात वापरले जातात, आणि शेतीसाठी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार बरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत आहेत, आणि या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानाच्या रूपामध्ये आर्थिक मदत करण्यात येते.
शेतीसाठी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन मिळून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे. आपण जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा विचार केल्यास यात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या उप-अभियान (Agri Machinery Subsidy) ही योजना देखील एक महत्त्वाची अशी योजना आहे.
Agri Machinery Subsidy या योजनेद्वारे शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्य शासनातर्फे अत्याधुनिक यंत्रे आणि उपकरणाच्या खरेदीसाठी 50 ते 80 टक्क्यांपर्यंतचे अनुदान देण्यात येत होते. मात्र आता अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे. आपण या लेखात महत्त्वाची माहिती घेऊ.
Yamaha MT15 V2 वर मिळत आहे बंपर डिस्काउंट
शेतीसाठी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन मिळून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे. आपण जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा विचार केल्यास यात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या उप-अभियान (Agri Machinery Subsidy) ही योजना देखील एक महत्त्वाची अशी योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्य शासनातर्फे अत्याधुनिक यंत्रे आणि उपकरणाच्या खरेदीसाठी 50 ते 80 टक्क्यांपर्यंतचे अनुदान देण्यात येत होते. मात्र आता अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे. आपण या लेखात महत्त्वाची माहिती घेऊ.
ट्रॅक्टर बरोबरच इतर यंत्रांच्या अनुदानामध्ये मोठी वाढ (Agri Machinery Subsidy)
कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान ही योजना शेतकऱ्यांकरता अत्यंत महत्त्वाची अशी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतीच्या कामामध्ये यंत्रांचा वापर वाढवण्यासाठी अनुदानच्या (Agri Machinery Subsidy) स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. पूर्वी कृषी यंत्र आणि उपकरणांवर याच योजनेच्या मध्यामतून फक्त 50 ते 80% पर्यंत अनुदान देण्यात येत होते. मात्र शासनाने आता या योजनेत मोठा बदल केला असून अनुदानामध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली आहे. त्यात प्रामुख्याने ट्रॅक्टर, पावर ट्रीलर बरोबरच कम्बाईन हार्वेस्टर या यंत्रांच्या अनुदानात जवळपास तिप्पट एवढी वाढ करण्यात आलेली आहे.
त्यामुळे ट्रॅक्टर खरेदी करताना ट्रॅक्टरसाठी तब्बल पाच लाख रुपयाचे अनुदान मिळणार असून पावर ट्रीलरसाठी १ लाख २० हजार तर कम्बाईन हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी तब्बल आठ लाख रुपयाचे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे.
असे असेल अनुदानाचे स्वरूप?
कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, पावर ट्रीलर, कम्बाईन हार्वेस्टर, नांगर बरोबरच पेरणी यंत्र, मळणी यंत्र, रोटावेटर, मल्चिंग यंत्र आणि चॉपकटर यासारख्या शेती कामासाठी लागणाऱ्या यंत्रांवर सामान्य श्रेणीतील शेतकऱ्यांना म्हणजेच सर्वसामान्य प्रवर्गामधील शेतकऱ्यांना अधिकतम 40 टक्क्यांपर्यंतचे अनुदान मिळणार असून एससी/ एसटी/अत्यंत मागासवर्गीय प्रवर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50 टक्के एवढा अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यात ट्रॅक्टरचा विचार केल्यास 4WD(40 पीटीओ एचपी किंवा जास्त) साठी सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना चार लाख रुपये तर असून एससी/एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच लाखांचे अनुदान मिळणार आहे. या पूर्वी या अनुदानाची मर्यादा मात्र १ लाख २५ हजार रुपयापर्यंत एवढीच होती.
अनुदानाचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
1- कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान ही या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्याकरिता सर्वात अगोदर https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागणार आहे.(तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.)
2- ही वेबसाईट ओपन झाल्यावर होम पेजवर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
घरबसल्या करा आधारला मोबाईल नंबर लिंक
3- नोंदणी केल्यावर तुम्हाला पुन्हा अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4- नंतर तुम्हाला ७ पर्याय दिसतील व त्यातील कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करावे.
5- नंतर तुमची विचारलेली वैयक्तिक माहिती भरावी. जसे की, तुमचे गाव, तुमचा तालुका, मुख्य घटकांत कृषी यंत्र उपकरणाच्या खरेदीकरीत अर्थसहाय्य याची माहिती प्रविष्ट करावी.
6- नंतर सविस्तर तपशीलमध्ये ट्रॅक्टरची निवड करून एचपी श्रेणीत 20 ते 35 एचपीपर्यंतचा पर्यायाची निवड करा. नंतर व्हील ड्राईव्ह प्रकारात 2WD/4WD यापैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड करावी. त्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करावी.
अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करून या अनुदानाचा लाभ मिळवू शकतात.